शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

By admin | Published: November 30, 2015 11:38 PM

नाशिकमध्ये अंमलबजावणी : शासनाचा केला धिक्कार

नाशिक : जलसंपदा मंत्रालयाने गंगापूर आणि दारणा धरणांतून नाशिक महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात केल्यानंतर महापालिकेने पाणी नियोजनासंबंधी तातडीने बोलाविलेल्या महासभेत शहरात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन महिन्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन एक दिवसाआड पाणीपुरवठ्यावर विचार केला जाणार आहे. दरम्यान, महासभेत भाजपा वगळता सर्व पक्षांच्या सदस्यांनी काळे डगले घालून शासनाचा निषेध नोंदविला.

महापौर अशोक मुर्तडक यांनी सुमारे सहा तास चाललेल्या महासभेत सदस्यांनी सुचविलेल्या विविध उपाययोजनांचा विचार करत डिसेंबर २०१५ आणि जानेवारी २०१६ या दोन महिन्यांसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दोन महिन्यांत एकवेळ पाणीपुरवठ्या व्यतिरिक्त अतिरिक्त सुमारे १०० दलघफू पाण्याची बचत होणार आहे. त्याचबरोबर महापौरांनी दारणा धरणातील १५० दलघफू आणि एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी सोडण्यात येणारे ३०० दलघफू पाण्याचे आरक्षणही गंगापूर धरणाकडे वर्ग करण्याची सूचना केली. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षीय शिष्टमंडळाने भेट घेण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, पाणी आरक्षणात कपात झाल्याने ओढवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी शहरातील विहिरींचे अधिग्रहण व त्यांची स्वच्छता करणे, बोअरवेल्स खोदणे, टॅँकरने पाणीपुरवठा करणे यासाठी खर्च येणार असल्याने शासनाकडे २० कोटी रुपयांची मागणीही करण्याचा निर्णय घेण्यात आला. दि. ४ डिसेंबरला उच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणीसाठी महापालिकेमार्फत निष्णात वकील देण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय पाणीबचतीसाठी नागरिकांचे प्रबोधन करतानाच भविष्यात पाणी पळवापळवीचा प्रकार घडू नये याकरिता मोठे जनआंदोलन उभारण्यावर सभागृहाचे एकमत झाले. (प्रतिनिधी)

चणकापूर, हरणबारीचा आज फैसला

समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या आधारे जळगाव शहरासाठी चणकापूर, हरणबारीसह चार धरणांतून गिरणा धरणात पाणी सोडण्याच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक होत असून, या धरणांमधून पाणी सोडण्यास कसमादेच्या लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांनी केलेला विरोध तसेच गंगापूर व दारणा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर जिल्ह्यात सर्वपक्षीय नेते, शेतकर्‍यांचा उठलेला क्षोभ लक्षात घेता खुद्द पाटबंधारे खातेच जळगावसाठी पाणी सोडण्यास अनुत्सुक असल्याचे वृत्त आहे.