सिन्नर : टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्यास मुदतवाढ न मिळाल्याने आठवडाभरापासून तालुक्यात टँकरने होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तालुक्यात १० गावे, ३७ वाड्यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. ३० जूनला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मुदत संपली. तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याची परिस्थिती जैसे थेच आहे. टॅँकरने पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावांतून केली जात आहे.
सिन्नरला आठवड्यापासून टँकरने पाणीपुरवठा बंद
By admin | Published: July 07, 2017 11:31 PM