शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

साखर कारखाने अडचणीत

By admin | Published: September 26, 2015 11:25 PM

श्रीराम शेटे : कादवा कारखान्याची वार्षिक सभा

दिंडोरी : यंदा साखरेचे भाव कोसळल्याने सर्वच कारखान्यांपुढे एफ आर पी कशी द्यायची हा प्रश्न पडला असून अनेक कारखान्यांचे गळीत हंगामावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे या अडचणीच्या काळात कादवा कारखाना सुरळीत सुरु राहण्यासाठी सभासदांनी सकारात्मक सहकार्य करावे असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.जिल्ह्यात सहकारी तत्वावर सुरु असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली कारखाण्याच्या प्रांगणात आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी श्रीराम शेटे बोलत होते. किरकोळ अपवाद वगळता सभा शांततेत पार पडली. प्रारंभी गत हंगामात सर्वाधिक उस पुरवठा करणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान कारखान्याने शासनाने जाहीर केलेल्या एफ आर पी (आधारभुत किंमत) मिळावी अशी मागणी सुरेश डोखळे, सचीन बर्डे यांनी केली. सचिन बर्डे यांनी कर्ज काढून रक्कम द्यावी तर सुरेश डोखळे यांनी एफ आर पी कसी द्यायची व कारखाना कसा सुरु ठेवायचा हि जबाबदारी संचालक मंडळाने पार पाडावी असे सांगत परतीच्या ठेवी ठेवण्यास विरोध केला तसेच चार महिन्यापूर्वी नफ्यात असलेला कारखाना तोट्यात कसा गेला असा सवाल उपस्थित केला. बाळासाहेब कामाले अँड विलास निरगुडे, नरेंद्र जाधव माजी संचालक जे डी केदार, संजय कावळे,संपत कावळे, राजदेव आदींनी देखील काही प्रश्न उपस्थीत केले. बापू संधान तानाजी माळी आदि सभासदांनी ठेव ठेवण्याचे मान्य करत कारखान्यास सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे सांगितले राजेंद्र उफाडे यांनी यापूर्वी इतर कारखान्यांना उस देणार्या सभासदांनी कारखाना बंद राहील असी भूमिका घेवू नये असे सांगितले. तर संपत कावळे यांनी ऊस उत्पादक व बिगर ऊस उत्पादक असा भेद न व निर्माण केला जाणार वाद चुकीचा असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील यांनी निफाड निसाका वसाका ची जशी परिस्थिती झाली तसी होवू न देण्यासाठी सर्व सभासदांनी कारखान्यास सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगत या प्रश्नवर कुणीही राजकारण करू नये असे आवाहन केले सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कादवाचे अध्यक्ष- श्रीराम शेटे म्हणाले की, राज्यात साखरेचे भाव कोसळल्याने देशभरात सर्वच कारखान्यांना आधारभुत किंमत कशी द्यायची असा प्रश्न पडला असुन साखरेचे भाव कमी मिळाल्याने उत्पादन खर्च कमी होत एफ आर पी ची किंमती शी त्याचा ताळमेळ होत देशातील सर्वच कारखाने कर्ज बाजारी झाले आहे. अशाही परिस्थीतीत कादवाने १८४४ रुपये उस उत्पादकांना अदा केले असुन उर्वरीत रक्कम शिल्लक साखर विक्र ी करु न अदा करण्यात येईल. मात्र शासनाने या मिहणा अखेर साखर कारखान्यांनी पर्यंत पुर्ण आधारभुत किंमत नाही दिली तर गाळप परवाना न देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी गाळप हंगाम कसा सुरु करायचा असा प्रश्न पडला आहे. यावर आपण सभासदांना आता यातून काय मार्ग काढायचे हे विचारले असून रु पये 273 परतीची ठेव देण्याचा पर्याय काही सभासदांनी सुचवला व त्यास या सभेने मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी व्यासपीठावर कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष उत्तम भालेराव, जि.प.चे उपाध्यक्ष प्रकाश वडजे, आमदार नरहरी झरिवाळ, जिल्हा बँकेचे संचालक गणपत पाटील, दिंडोरी कृउबा चे सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती अनील देशमुख, जे.डी. केदार, सुरेश डोखळे, भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे, अ‍ॅड. विलास निरगुडे, विश्वास देशमुख, विलास कड, नामदेव घडवजे, नरेंद्र जाधव, कादवाचे सचीव बाळासाहेब उगले आदींसह सर्व संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थीत होते.