नाशिक : शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने त्यावरील उपाययोजनाही तोकड्या पडल्या असून, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिसांची नेमणूक, वळण रस्त्याचा वापर यासह विविध प्रयोग फसल्यानंतर आता द्वारका चौफुलीचा वापर करून पुण्याकडे जाऊ पाहणा-या अवजड वाहनांना या मार्गाचा वापरच बंद करण्याचा नामी उपाय शहर वाहतूक पोलिसांनी शोधून काढला आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणा-या वाहनांनी यापुढे सायंकाळी घोटी-सिन्नर मार्गाचा वापर करावा अशा सुचना करण्यात आल्या आहेत.शहरातून जाणा-या मुंबई-आग्रा महामार्गामुळे नाशिक शहरातील मूळ वाहतुकीला कोणताही धक्का न पोहचता ती सुरूळीत राहण्यासाठी प्रकाश पेट्रोलपंप ते पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत राज्यातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येवून धुळ्याकडून मुंबईकडे जाणारी व मुंबईकडून धुळ्याकडे जाणारी वाहतूक विना अडथळा मार्गक्रमण करणे अपेक्षित धरण्यात आली होती. तथापि, मुंबईकडून येणाºया वा धुळ्याकडून येणाºया वाहनांना नाशिकमध्ये मालाची चढ-उतार करायचे असल्यास त्यांना राष्टÑीय महामार्गाऐवजी समांतर रस्त्याचा वापर करू लागल्याने त्याचा ताण महामार्गाबरोबरच शहरवासियांसाठी तयार करण्यात आलेल्या समांतर रस्त्यावरही पडू लागला आहे. त्यामुळे राष्टÑीय महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रकार सातत्याने घडत असताना त्याचा सर्वाधिक ताण द्वारका चौफुलीवर चौहोंबाजूंनी येवून पडत आहे. परिणामी या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी होवून वाहनांच्या लांब लांब रांगा दरररोज उभ्या राहात आहेत. सकाळी दहा ते दुपारी बारा व सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत द्वारका चौफुली वाहतुकीसाठी धोकेदायक ठरू लागला असून, त्यातून वाहनचालकांचा एकमेकांना धक्का लागण्याच्या तसेच लहान मोठे अपघाताला आमंत्रण मिळू लागले आहे. द्वारका चौफुलीवर वाहतूक कोंडी होवू नये यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या परंतु त्या सर्व फोल ठरल्या आहेत. त्यामुळे आता दुपारी चार ते रात्री आठ या चार तासांसाठी मुंबईकडून उड्डाणपुलाचा वापर करून रॅम्पने राष्टÑीय महामार्गावर उतरणाºया तसेच समांतर पुलाचा वापर करून द्वारका चौफुलीवरून पुण्याकडे जाणाºया सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. तशी अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याऐवजी वाहनचालकांनी घोटी-सिन्नरमार्गाचा वापर करून पुण्याकडून मार्गस्थ व्हावे असा उपाय सुचविण्यात आला आहे.
अवजड वाहनांना नाशिक-द्वारका चौफुलीवरून पुण्याचा मार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 2:57 PM
शहरातून जाणा-या मुंबई-आग्रा महामार्गामुळे नाशिक शहरातील मूळ वाहतुकीला कोणताही धक्का न पोहचता ती सुरूळीत राहण्यासाठी प्रकाश पेट्रोलपंप ते पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयापर्यंत राज्यातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येवून धुळ्याकडून मुंबईकडे
ठळक मुद्देवाहतुक कोंडीवर मार्ग : घोटी-सिन्नर मार्गाच्या वापराचा पर्याय द्वारका चौफुलीवर वाहतुकीची कोंडी