नाशिक : महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला. मागील वर्षी निकालाची टक्केवारी ८८.२२ इतकी होती. यंदाही विभागात मुलीच हुशार असल्याचे सिद्ध झाले असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. विद्यार्थ्यांना येत्या १२ जून रोजी गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा नाशिक विभागाचा निकाल विभागाचे सचिव मारवाडी यांनी जाहीर केला. त्यानुसार विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल ८६.८५ टक्के इतका लागला. धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८८.८७ टक्के, तर जळगाव जिल्ह्याचा निकाल ८४.२० आणि नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ८४.७० टक्के इतका लागला.
बारावीत मुलीच हुश्शार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:11 AM