लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजेपासून करण्यात येणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत महाविद्यालयांना गुणपत्रिका वितरीत करण्यात येणार असून, त्यासाठी विभागीय शिक्षणमंडळाने ११ वाटप केंद्र निश्चित केले आहेत.बारावीचा निकाल आॅनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशालाठी मूळ गुणपत्रिकांची प्रतीक्षा लागली होती. या गुणपत्रिका शनिवारीच (दि.२५) विभागीय मंडळाला प्राप्त झाल्या होत्या. त्यांचे माहाविद्यालयनिहाय वर्गीकरण व पडताळणी करून विद्यार्थ्यांना ३१ जुलै रोजीपासून गुणपत्रिका वितरत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी ३० जुलै रोजी तालुकानिहाय गुणपत्रिकांचे वितरण केले जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निकालपत्रक वितरित करताना शासकीय नियमांचे पालन करावे. गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, तसेच विशिष्ट तारखेलाच गुणपत्रक घेऊन जावे, असा आग्रह महाविद्यालयांनी करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.शाळांसाठी निकालपत्र वाटपाचे नियोजनबारावीचे निकालपत्र महाविद्यालयांना गुरुवारी (दि.३०) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत शिक्षण मंडळाकडून वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय मंडळाने तालुकानिहाय नियोजन केले आहे, अशी माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
बारावीच्या गुणपत्रिका शुक्रवारी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:00 AM
नाशिक : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजेपासून करण्यात येणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत महाविद्यालयांना गुणपत्रिका वितरीत करण्यात येणार असून, त्यासाठी विभागीय शिक्षणमंडळाने ११ वाटप केंद्र निश्चित केले आहेत.
ठळक मुद्देप्रतीक्षा संपुष्टात : पुढील शैक्षणिक प्रवेशांचा मार्ग मोकळा