देसराणे : कळवण तालुक्यातील सुतार-लोहार समाजातील ८० टक्के मंडळी लाकडी, लोखंडी कामे करतात. हा समाज या निर्बंधांमुळे पूर्णतः खचला आहे. शासनाने अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा सुतार-लोहार समाजातील गरजू बांधवांना करावा व त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची मागणी होत आहे.कोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात निर्बंध लागू झाले आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लोहारकाम, सुतारकाम बंद असल्यामुळे हा वर्ग आर्थिक अडचणीत सापडला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आगामी काळात निर्बंधाच्या मुदतीत वाढ झाल्यास काम धंदा ठप्प पडणार असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न समाजासमोर निर्माण झाला आहे. यामुळे शासनाने व्यावसायिक कामगारांना स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कळवण तालुक्यातील सुतार लोहार समाज बांधवांनी केली आहे.
निर्बंधांमुळे बारा बलूतेदार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 6:48 PM
देसराणे : कळवण तालुक्यातील सुतार-लोहार समाजातील ८० टक्के मंडळी लाकडी, लोखंडी कामे करतात. हा समाज या निर्बंधांमुळे पूर्णतः खचला आहे. शासनाने अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तुंचा पुरवठा सुतार-लोहार समाजातील गरजू बांधवांना करावा व त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची मागणी होत आहे.
ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात निर्बंध लागू झाले आहेत.