बाजार समितीत केवळ शेतकऱ्यांना प्रवेश दिला जात होता. त्यात शेतमाल आणणाऱ्या चालकाचा वाहनपरवाना बघून सोडले जात होते, तर अन्य बाजार समिती घटकांना पास बघून प्रवेश दिला जात होता. महिला हमालांना ‘नो एन्ट्री’ केली होती. आज बाजार समिती सुरू झाल्यानंतर साधारणपणे १० टक्के शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीला आणलेला होता.
सोमवारी महिला हमालांना बंदी केल्याने महिला हमालांनी प्रवेश
द्वारावर असलेल्या सुरक्षारक्षक व बाजार समिती कर्मचाऱ्यांशी
वाद घालण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवेश द्वारावर पोलीस बळ तैनात करण्यात आल्याने महिला हमालांना प्रवेश दिला नाही, तर लिलावाच्या वेळी व्यापारी तसेच शेतकऱ्यांनी गर्दी केली होती त्यामुळे कोरोना नियमांचे काही प्रमाणात उल्लंघन झाले युवक हमालांनी गर्दी केली त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
बाजार समितीत किरकोळ विक्रेते तसेच भरेकऱ्यांना प्रवेश
नाकारल्याने त्यांनी बाजार समितीत प्रवेश नाकारलेल्या किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांकडून शेतमाल खरेदी केला बाजार समितीत प्रवेश नाकारल्याने अनेक किरकोळ शेतकरी वर्गाने कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर असलेल्या दिंडोरीरोडवर मिळेल त्या ठिकाणी शेतमाल विक्री केली बाजार समिती बाहेर शेतकरी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कोराना नियम पायदळी तुडविल्याचे चित्र दिसून आले. बाजार समितीत एरवी सेल हॉलमध्ये शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होते, मात्र सोमवारी बाजार समिती सुरू झाल्यानंतर सेल हॉल आवारात काहीसा शुकशुकाट बघायला मिळाला.
इन्फो बॉक्स
तर जागेवर अँटिजन चाचणी
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात येऊन त्यांना बाजार समितीत प्रवेश द्यावा असे म्हटले आहे. जर महापालिका प्रशासनाने शेतकऱ्यांच्या चाचणीसाठी अँटिजन किट उपलब्ध करून दिले तर बाजार समिती डॉक्टर तसेच आरोग्य यंत्रणा असल्याने तत्काळ प्रवेशद्वारावर अँटिजन चाचणी करून त्यानुसार शेतकऱ्यांना प्रवेश दिला जाईल. महापालिका प्रशासनाने अँटिजन किट उपलब्ध करून द्यावे यासाठी बाजार समिती पत्रव्यवहार करणार आहे.