गुरुवार, दि.६ ते रविवार १६ मेपर्यंत गावातील किराणा दुकाने आणि इतर व्यवसाय सलग १२ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. सरपंच मंजुश्री घोटेकर, उपसरपंच रंजना घोटेकर, सदस्य गोरक्षनाथ घोटेकर, संगिता घोटेकर, संतोष सरोदे, संतोष घेगडमल, विलास यादव, जयश्री यादव, शोभा बच्छाव, ग्रामसेवक संदीप वाकचौरे, कर्मचारी विलास गुंजाळ, लक्ष्मण कडवे आदींच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. जनता कर्फ्यूच्या काळात दुकाने सुरू असल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्याचे निश्चित करण्यात आले. गावातील दूध संकलनासाठी सकाळ आणि संध्याकाळी सहा ते आठ अशी दोन तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कोरोनाबाधित आणि ज्या घरात मृत्यूच्या घटना घडल्या आहेत त्या घरांतील सर्व सदस्यांनी १४ दिवस गृहविलगीकरण पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. गावातील कोरोनाची भयावह स्थिती पाहता गावकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नाइलाजास्तव कडक नियमावलीची अंमलबजावणी करावी लागत असून, ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.
इन्फो
मास्क न लावल्यास दंड
विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींना २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. ही दंडाची रक्कम ज्या व्यक्ती रोख स्वरूपात ग्रामपंचायतीकडे भरणा करणार नाहीत, त्यांच्या घरपट्टी बिलात अटॅचमेंट केली जाणार असून ही रक्कम भरल्याशिवाय ग्रामपंचायतीकडून सदर व्यक्तीला कुठलाही दाखला दिला जाणार नाही. गावात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला जाणार आहे. बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश दिला जाणार नाही.