नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल मंगळवारी (दि.३) जाहीर केला असून यावर्षीही विभागात बारावीच्या मुलींनीच बाजी मारली आहे. नाशिक विभागातून यावर्षी ९९.५६ मुलांसह ९९.६७ मुलीं उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाणे ०११ टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यातील उतीर्ण विद्या्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून येथील ९९. ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर धुळे ९९.७५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह दुसऱ्या स्थानी असून नाशिक ९९.५७ उत्तीर्णांसह तिसऱ्या व जळगाव ९९.५४ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
कोरोना संकटामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मुल्यमापन पद्धतीनुसार दहावीतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या वार्षि क मुल्यमापनातील विषय निहाय गुण व बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मुल्यमापनातील प्राप्त गुणांच्या आधारे बारावीसाठी भारांशानुसार कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमित विद्यालयांनी विद्यार्थ्यांना गुणदान केले होते. त्याआधारे शिक्षण मंडळाने मंगळवारी निकाल जारीर केला. या अंतर्गत मुल्यमापनामुळे अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून हे प्रमाण जवळपास शून्य टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे नाशिक विभागातील नाशिकसह, धुळे , नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये ९९क्क्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.