शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

पहिनेच्या जंगलात बारा तास आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 12:42 AM

नाशिक : त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पहिने गावाच्या शिवारातील राखीव वनक्षेत्रामध्ये अवैधरीत्या घुसखोरी करत, भटकंतीच्या नावाखाली दोघा तरुणांनी निष्काळजीपणा दाखवून धूम्रपान करत फेकलेल्या सिगारेटच्या थोटकांमुळे मोठा कृत्रिम वणवा भडकला. भडकलेली आग विझविताना वनकर्मचारी व सुमारे दीडशे ग्रामस्थांच्या नाकीनव आले. शनिवारी (दि.६) पहाटेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत सुमारे ३७ हेक्टरवरील वनक्षेत्र बाधित झाले, तसेच सुमारे २० ते २५ हजार रोपे नष्ट झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या कृत्रिम वणव्यात जैवविविधतेची अपरिमित हानी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे३७ हेक्टर वनक्षेत्र खाक : दीडशे गावकऱ्यांसह वनकर्मचाऱ्यांचे रात्रभर शर्थीचे प्रयत्न

नाशिक : त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पहिने गावाच्या शिवारातील राखीव वनक्षेत्रामध्ये अवैधरीत्या घुसखोरी करत, भटकंतीच्या नावाखाली दोघा तरुणांनी निष्काळजीपणा दाखवून धूम्रपान करत फेकलेल्या सिगारेटच्या थोटकांमुळे मोठा कृत्रिम वणवा भडकला. भडकलेली आग विझविताना वनकर्मचारी व सुमारे दीडशे ग्रामस्थांच्या नाकीनव आले. शनिवारी (दि.६) पहाटेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत सुमारे ३७ हेक्टरवरील वनक्षेत्र बाधित झाले, तसेच सुमारे २० ते २५ हजार रोपे नष्ट झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. या कृत्रिम वणव्यात जैवविविधतेची अपरिमित हानी झाल्याने संताप व्यक्त होत आहे.मार्च महिन्याला प्रारंभ झाल्याने उन्हाच्या झळा अतितीव्र स्वरूपात जाणवू लागल्या आहे. शहरासह जिल्ह्यातील पारा वेगाने वाढत असल्यामुळे जंगलातील रानगवत वाळून एखाद्या ज्वलनशील पदार्थांइतकेच घातक झाले आहे. यामुळे या गवताचा ज्वलनशील घटकांशी संबंध येताच कृत्रिम वणवे त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रात मागील आठवडाभरापासून भडकत आहे. पहिने गावाचा परिसर निसर्गरम्य असून, पावसाळ्यासह बारामाही हा भाग शहरी नागरिकांना आकर्षित करत असतो. येथील डोंगररांगा व राखीव वनांमध्ये भटकंतीसाठी तरुणाई जात असते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पहिनेजवळी राखीव वनाभोवती महाविद्यालयीन दोघा तरुणांनी धूम्रपान करत दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे मोठी आग भडकली. पहिनेच्या ३५३ गटात भडकलेल्या या मानवनिर्मित वणव्यामध्ये सुमारे दोन वर्षे वाढ झालेली हजारो रोपे होरपळून राख झाली. वाळलेले गवत आणि पाळापाचोळा वेगाने पेटू लागल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत, त्र्यंबकेश्वर वन कर्मचाऱ्यांना माहिती कळविली. माहिती मिळताच पारंपरिक पद्धतीने आग विझविण्यासाठी नागरिकांनी सुरुवात केली.राखीव वनात बारा तास आगीचे तांडवपंधरा ते वीस वनर्कमचारी आणि दीडशे गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालत रात्रीच्या काळोखात आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. झाडांच्या तोडलेल्या ओल्या फांद्यांची ह्यझाडूह्ण तयार करत झोडपणी करून पेटलेले गवत विझवित होते. मात्र, वारा रात्री प्रचंड सुटल्याने भडकलेली आग काही करता शमत नव्हती. शुक्रवारी (दि.५) संध्याकाळी सात वाजल्यापासून भडकलेली आग शनिवारी सकाळी सात वाजेपर्यंत विझता विझत नव्हती. या आगीवर शनिवारी सकाळी आठ वाजता पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास यश आले.दोघे संशयित ताब्यात; दोघे फरारगावकऱ्यांच्या मदतीने संशयित सौरभ संदीपान पवार, चंद्रकांत भट्टू महाले या दोघा संशयित तरुणांना वन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. त्यांचे दोन साथीदार मित्र मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाले. या दोघांना इगतपुरी तालुका न्यायालयात शनिवारी हजर केले असता, न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे. पवार व महाले हे त्यांच्या दोन मित्रांसह राखीव वनाजवळ मद्यपान-धूम्रपान करत होते, यावेळी त्यांनी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले. हे दोघेही युवक वैद्यकीय शाखेच्या अखेरच्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत.फोटो आर वर ०६फायर नावाने

टॅग्स :Fairजत्राCrime Newsगुन्हेगारी