ओझर : येथील नगरपरिषदेमध्ये नमुना आठच्या नोंदीचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प झाले असल्यामुळे नोंदीचे जवळपास बाराशे ते तेराशे प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी अनेकांना स्वत: ची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी या मिळकतीची पुनर्विक्री करता येत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने नगरपरिषदेने नोंदीचे काम सुरु करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.ओझरला ग्रामपंचायत की नगरपरिषद हा राजकीय वाद न्यायालयाच्या कचाट्यातून सुटला असून नगरपरिषद राहाणार आहे. ओझर गावातील विस्तारणाऱ्या ओझरगाव व उपनगरात अनेकांनी खरेदी केलेल्या सदनिका प्लॉटच्या बाराशे,तेराशे नोंदी रीतसर नमुना नं आठ (करास पात्र इमारती, जमिनी किंवा प्लॉट ) वर मालकी हक्कासाठी नोंदी गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असल्याने ज्यांना त्यांनी खरेदी केलेली मिळकत पुनर्विक्री करायची असेल त्यांना विक्री करता येत नाही. त्यामुळे लग्न कार्य. ,शिक्षणासाठी, आर्थिक देणे पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकजण आर्थिक विवंचनेत सापडले आहेत तसेच नगरपरिषदेचे उत्पन्नही बुडत आहे.आता नगरपरिषद झाली सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून शासनाकडून नगरपरिषदेसाठी पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक ही झाली आहे, परंतु आद्याप ही नमुना नं आठच्या नोंदीचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे बाराशे तेराशे प्रकरण प्रलंबित असून नोंदीसाठी दिरंगाई करुन नागरिकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे ज्यांनी सदनिका किंवा प्लॉट घेतले आहेत ते नोंदी होण्यापासून वंचित आहेत दरम्यान नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी प्रलंबित असलेले नोंदीचे प्रकरणांच्या नोंदी सुरू कराव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.ओझर नगरपरिषद मधील नोंदीचे काम सुरू करण्याबाबत संबधित विभागातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या असून नोंदीचे काम लवकरच सुरू होईल.- किरण देशमुख, मुख्याधिकारी ,नगरपरिषद, ओझर
नोंदीचे बाराशे तेराशे प्रकरणे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 10:41 PM
ओझर : येथील नगरपरिषदेमध्ये नमुना आठच्या नोंदीचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प झाले असल्यामुळे नोंदीचे जवळपास बाराशे ते तेराशे प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी अनेकांना स्वत: ची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी या मिळकतीची पुनर्विक्री करता येत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने नगरपरिषदेने नोंदीचे काम सुरु करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देओझर नगरपरिषद : नमुना आठच्या नोंदीचे काम ठप्प