नाशिक : गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या ‘नाम आहे आदि अंत नाम सर्व सार’ या भक्तिगीतातील ओळींची प्रचिती सध्या येऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर नजर टाकल्यानंतर येत आहे. नावात काय आहे? असे म्हटले जाते. परंतु नावात खूप काही आहे. एकाच नावाच्या अनेक महिला उमेदवार, तसेच एकाच नावाचे, आडनावाचे पुरुष उमेदवार यंदा उमेदवारी करत आहे. त्यात संगीता, सुनीता, ज्योती अशा सामान्य मानल्या जाणाऱ्या नावाच्या सर्वाधिक महिला उमेदवार पहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत जवळपास १२ संगीता, ९ ज्योती, ७ सुनीता, ७ अर्चना, ६ जयश्री, ६ वैशाली, ६ शीतल, ५ अनिता, ५ सुवर्णा तसेच पूनम, रंजना, सुवर्णा, मनीषा, हेमलता, माधुरी, लता, शोभा या नावांचे एकापेक्षा जास्त उमेदवार पहायला मिळत आहेत. नावांप्रमाणेच आडनावांचे साम्यही अनेक प्रभागात आणि बहुतांशी तर एकाच प्रभागात सारख्याच आडनावाचे जास्त उमेदवार पहायला मिळत आहे. प्रभाग २ अ मध्ये २ जाधव, प्रभाग ४ अ मध्ये २ कर्डक, प्रभाग ८ ब मध्ये ३ बेंडकोळी, प्रभाग ९ अ मध्ये २ अहिरे, प्रभाग १० ड मध्ये ३ नागरे, प्रभाग ११ अ मध्ये २ अहिरे, प्रभाग ११ ड मध्ये २ काळे, २ निगळ, प्रभाग १३ ब मध्ये २ वाघ, प्रभाग १४ ड मध्ये २ पठाण, ४ शेख, प्रभाग १६ अ मध्ये २ साबळे, ड मध्ये २ गायकवाड, प्रभाग १७ अ मध्ये २ गांगुर्डे, प्रभाग १७ ब मध्ये २ जाधव, प्रभाग १७ ड मध्ये ३ आढाव, प्रभाग १८ क मध्ये २ बोराडे, प्रभाग १९ अ मध्ये २ कांबळे, २ साळवे, प्रभाग १९ क मध्ये ३ शेख, प्रभाग २० अ मध्ये ४ पगारे, क मध्ये २ गायकवाड, प्रभाग २१ ड मध्ये ३ शेख, प्रभाग २२ अ मध्ये २ घोलप, क मध्ये २ कोठुळे, २ जाधव, २ गायकवाड, प्रभाग ३१ अ मध्ये ३ दोंदे असे सारख्याच आडनावाचे उमेदवार पहायला मिळत आहे. त्यामुळे मतदान करायला गेल्यानंतर मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. घरून ठरवून गेलेल्या उमेदवाराऐवजी प्रत्यक्ष मतदान करताना दुसऱ्याच नावापुढचे बटण दाबले जाऊ शकते. याशिवाय एका प्रभागात प्रत्येक मतदाराला ३ ते ४ उमेदवारांना मतदान करायचे आहे, हेदेखील काही जणांना समजणार नाही व यातील कुणाला नक्की मतदान करायचे असा प्रश्नही पडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)प्रकाश, किरण, प्रशांत सर्वाधिकयेऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतील ३१ प्रभागांमधून उभ्या असणाऱ्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास प्रकाश नावाचे उमेदवार जवळपास १०, किरण नावाचे उमेदवार ९, अरुण नावाचे उमेदवार ४ असून प्रशांत, सुरेश, संजय, नितीन, अंबादास, देवीदास, गोपाळ अशा नावाचे उमेदवारही मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. एकाच प्रभागात सारख्या नावाचे उमेदवारही असून, त्यात प्रभाग १ अ मध्ये २ अरुण, प्र.१९ अ मध्ये ४ संतोष, ३१ ड मध्ये २ सुदाम नावाचे उमेदवार आहेत. त्यामुळे आडनावांबरोबरच नावातील साम्यही मतदारांची दिशाभूल करणारे ठरू शकते.
बारा संगीता, नऊ ज्योती, दहा प्रकाश, नऊ किरण
By admin | Published: February 18, 2017 11:29 PM