कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा फटका इतर सर्व घटकांप्रमाणे आदिवासी समाजालादेखील बसला. या अवघड काळात आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी खावटी योजनेचा लाभार्थींना लाभ देताना जे वंचित असतील त्यांना सामावून घ्या, असे आवाहन करीत लाभार्थींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटची विक्री न करता लाभ घ्या, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळवण व विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने मानूर येथील केबीएच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत अनुसूचित जमातीतील कुटुंबीयांना साह्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेंतर्गत जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, आदिवासी सेवा समितीचे सहसचिव राजेश शिंदे, सरपंच योगेश चव्हाण, उपसरपंच रवींद्र बोरसे, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे.एस. राठोड, उपप्रादेशिक अधिकारी तुषार मोरे, सौ. एस.एन. मोरे, आर. एस. बनसोडे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी पंकज बुरकुले, लेखाधिकारी बर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी पाटील आदी उपस्थित होते.
----
किट खराब निघाल्यास संपर्क करा
खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थींनी लाभ घ्यावा, किटमध्ये वस्तू खराब निघाल्यास आदिवासी विकास कार्यालयाशी संपर्क साधावा, जे लाभार्थी वंचित असतील त्यांनी कागदपत्रे पूर्तता करावी, आदिवासी भागात जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.
कळवण तालुक्यातील १२,६४३ लाभार्थींना खावटी योजनेंतर्गत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. दहा लाभार्थींना किट देऊन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या किटमध्ये दोन हजार रुपये किमतीच्या किराणा वस्तू देण्यात येणार आहेत. यामध्ये मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, स्वयंपाकाचे तेल, गरम मसाला, मिर्ची पावडर, मीठ, चहा पत्ती या वस्तूंचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ अहिरे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती अहिरे यांनी केले.
---
कळवण येथे खावटी योजनेंतर्गत जीवनावश्यक वस्तू वाटपाचा शुभारंभ याप्रसंगी आमदार नितीन पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, राजेश शिंदे, सरपंच योगेश चव्हाण, रवींद्र बोरसे, जे.एस. राठोड, पंकज बुरकुले आदी. (१३ कळवण खावटी)
130721\13nsk_33_13072021_13.jpg
१३ कळवण खावटी