पंचवटी : श्रावणमास पूर्णाहुती सोहळ्याच्यानिमित्त शुक्र वारी (दि.३०) सायंकाळी पेठरोडवरील कैलासमठात ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या हस्ते व साधू-महंतांच्या उपस्थितीत महादेवाच्या शिवलिंगावर कमल पुष्पार्चन करून पूजन करण्यात येऊन श्रावणमास पूर्णाहुती करण्यात आली.संपूर्ण श्रावण महिन्यात ओंकारेश्वर येथील नर्मदेश्वर येथून आणलेल्या ५१०० शिवलिंगाचे साधू महंतांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात गेल्या २६ वर्षांपासून रु द्राभिषेक सुरू आहे. संपूर्ण विश्वात शांती नांदावी, सर्वत्र पर्जन्यवृष्टी व्हावी, हरितक्र ांती घडावी, शेतकरी सुखी व्हावा, यासाठी सोहळ्याचे आयोजन केले जाते.देशपातळीवर विविध स्पर्धांत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा संविदानंद सरस्वती राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरव करण्यात आला, तर सायंकाळी ६ ते ९ वेळेत श्रावणमास पूर्णाहुती सोहळा झाला. या सोहळ्यासाठी कोलकाताहून १२ हजार कमलपुष्प आणले होते. ब्रह्मदेवाच्या शिवलिंगावर कमलार्चन सोहळ्यानंतर स्वामी संविदानंद सरस्वती यांचे प्रवचन झाले. पूर्णाहुती या सोहळ्याला स्वामी कामेश पुरी, शंकरानंद, स्वामी सागरानंद, रामसनेहीदास, श्याम चैतन्य, राघव चैतन्य, राजेंद्रदास, ब्रह्मदत्त शर्मा, सत्यप्रकाश, महंत भक्तिचरणदास आदींसह साधू-महंत, भाविक उपस्थित होते. पौरोहित्य वेदमूर्ती भालचंद्र शौचे, विनय त्रिपाठी यांनी केले.श्रावणमासनिमित्ताने दैनंदिन आरती, शिवलिंग पूजन, अभिषेक कार्यक्रम सुरू होते. कमलार्चन, बिलवार्चन, विविध फुलांचे पुष्पार्चन करण्यात आले. संपूर्ण श्रावणात एक सहस्त्र दीपदान, कार्यक्र म संपन्न झाला. संगीत लिंगाष्टक पाठ तसेच दीपोत्सव करण्यात आला. सकाळी दैनंदिन पूजन महाआरती, अभिषेक व रु द्राभिषेक करण्यात आला.
बारा हजार कमल पुष्पार्चनाने श्रावणमास पूर्णाहुती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 1:01 AM