सायखेडा : म्हाळसाकोरे येथील आरूढ विद्यालयात अठ्ठावीस वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या मुलांची पुन्हा एकदा रविवारी शाळा भरली आणि तेव्हा वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकांनी वर्गावर तास घेऊन भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला.अनेक दिवस विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतर पुन्हा एकदा गत आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र यायचं नक्कीकरून सर्व शिक्षक आणि मुले रविवारी एकत्र आली. पूर्वीप्रमाणे शाळेची घंटा वाजली, मुले वर्गात गेली शिक्षक वर्गात आले आणि अध्यापन केले. संपूर्ण दिवस हा आठवणींनी घालविला. शेवटी मनोगते झाली. शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कावेरी मामुलकर, विजय खेलूकर, दिनकर पोटे, संगीता पवार, छाया सांगळे, वाल्मीक सानप, सोमनाथ बोडके, सोमनाथ जगताप, सचिन डेंगळे, गोरख कांदे, संतोष पठारे, जगन्नाथ पाटील, संतोष पठारे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला टीव्ही व रोख रक्कम भेट दिली.दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वच मित्रांच्या जीवनाच्या वाटा बदलतात. आपल्या आवडीने वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाला जातात. दहा वर्षे एकाच बेंचवर बसलेल्या मित्रांची दिशा बदलते आणि अनेक वर्षे भेटी होत नाही. दिनकर पोटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हॉट्सअॅपचा ग्रुप तयार केला एकमेकांचे नंबर मिळवत त्यांनी सर्व मित्र आणि शिक्षकांना जोडले.
अठ्ठावीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 10:28 PM