नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या शाळांसह सर्व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले असले तरी शहरातील वीस टक्के अनुदानित शाळांमधील अनेक विद्यार्थी अजूनही पाठ्यपुस्तकांपासून वंचित असल्याचा प्रकार समोर आला आहे.महापालिका क्षेत्रातील काही शाळांना २० टक्के अनुदान प्राप्त झाले असले तरी त्यांची माहिती यूडीआयएसई प्रणालीवर अद्ययावत करण्यात आलेली नसल्याने महापालिकेला सध्याच्या पटसंख्येपेक्षा कमी पुस्तके मिळाली होती. यात महापालिके च्या शाळांना प्राधान्यक्रमाने पुस्तकांचे वितरण करण्यात आल्यानंतर अनुदानित शाळांनाही पुस्तकांचे वितरण करण्यात आले. मात्र अद्ययावत पटसंख्येनुसार शाळांनी केलेली मागणी आणि महापालिकेला प्राप्त झालेल्या पुस्तकाच्या संख्येत तफावत असल्याने २० टक्के अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळू शकले नसल्याचे समोर आले आहे.मात्र शिक्षण विभागाने महापालिके च्या शाळांसह सर्व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण झाल्याचे स्पष्ट केले असून, २० टक्के अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ९० टक्के पुस्तकांचे वितरण करण्यात आल्याचा दावा केला आहे.
वीस टक्के अनुदानित शाळांचे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:15 AM