वणी : बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यानंतर बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून दोन अज्ञात संशयितांनी युवकाला वीस हजाराला गंडविल्याने खळबळ उडाली आहे. नंदू शिंदे हे शुक्र वारी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बँक आॅफ महाराष्ट्र वणी शाखेत गेले होते. पैशाची गरज असल्याने एटीएममधून त्यांनी वीस हजार रु पये काढले. त्या दरम्यान दोन अज्ञात त्या ठिकाणी आले व शिंदे यांच्याशी संभाषण सुरू केले व आम्हाला मजुरी वाटायची आहे असे सांगितले व तुमच्याकडे असलेले सुटे पैसे द्या आम्ही बंधे देतो असे म्हणाले व दोन हजार रु पयांचा नोटांचा बंडल काढला त्यातील बंडलाच्या वरची व खालची अशा दोन हजाराच्या दोन नोटा एका संशियताने दुसऱ्या संशयिताकडे देत सुटे पैसे घेण्याचा बहाणा केला. तसेच नोटाच्या आकाराचा कोरे कागद असलेला बंडल रु मालात टाकून शिंदे यांना दिला व त्यांच्याकडुन शंभर रुपयांचा दहा हजाराचा बंडल व पाचशे रु पयांच्या वीस नोटा असे एकुण वीस हजार रु पये घेतले व क्षणाधार्त ते चोरटे पसार झाले. शिंदे यांनी रु माल उघडून पाहिला असता फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सिसिटिव्ही फुटेज मधे ते संशयीत बँक व परिसरात दिसतात किंवा कसे? याबाबत शोध सुरू आहे. दरम्यान परिसरात शोध घेऊनही त्या भामट्यांची माहिती मिळाली नाही. ठराविक कालावधी नंतर वारंवार पैसे लांबविण्याच्या घटना याठिकाणी घडल्याने भितीचे वातावरण आहे.
बोलण्यात गुंतवून युवकाला वीस हजाराला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:14 AM