नाशिक : हॉटेलमध्ये कॅशियर म्हणून काम करणाऱ्यानेच सुमारे सव्वातीन लाखांच्या रकमेचा अपहार केल्याची घटना आडगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली आहे़ आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिर्चीमध्ये संशयित योगेश अर्जुन साळुंखे (रा. शिंदेनगर, मखमलाबाद) हा कॅशियर म्हणून काम करतो़ हॉटेलमालकाने विश्वासाने सर्व आर्थिक व्यवहार साळुंखेवर सोपविले होते़ त्याने २० मे २०१५ ते १७ जुलै २०१५ या कालावधीत सुमारे तब्बल ३ लाख १७ हजार २१२ रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद संजय किसनराव बागुल यांनी दिली आहे़ या प्रकरणी संशयित साळुंखेवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
हॉटेलमध्ये सव्वातीन लाखांचा अपहार
By admin | Published: October 27, 2015 12:13 AM