नाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट नोंदवली गेली. मंगळवारी (दि. १) १ हजार ४८२ नवे रुग्ण आढळून आले. यात शहरातील ८६८, ग्रामीण भागातील ५६३, मालेगावी ६ तर जिल्हाबाह्य ४५ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान २ हजार ८७४ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. दिवसभरात ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
नाशिक शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत घट होत असल्याने ही दिलासादायक बाब असली तरी मृतांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. गत आठवडभरापासून दररोज पाच ते सहा जणांचा बळी जात आहे. मंगळवारी नाशिक शहरातील ३, मालेगावी १ तर नाशिक ग्रामीणमधील २ जणांना कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूची एकूण संख्या ८ हजार ८१८ वर पोहचली आहे. रविवारी बाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजे २ हजार ८७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्हात सध्यस्थितीत १३ हजार ४५० सक्रीय रुग्ण असून त्यातील १२६ रुग्ण ऑक्सिजनवर तर २६ व्हेटींलेटवर आहेत.