पाटोदा : येथील तरु ण व प्रयोगशील शेतकरी संदीप सोनवणे या द्राक्ष उत्पादक शेतकºयाने पाण्याची कमतरता तसेच लागवड केलेले द्राक्ष वाण उत्पन्न रहित असल्याने आपल्या दोन एकर द्राक्षबागेवर स्वत: तसेच मजुरांकरवी कुºहाड चालवीत संपूर्ण द्राक्षबाग भुईसपाट करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.गेल्या पाच-सहा वर्षांपासून परिसरातील शेतकरी भयाण दुष्काळाचा सामना करीत आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असूनही अनेक शेतकºयांनी उपलब्ध पाण्यावर यावर्षी नाही तर पुढील वर्षी चांगला पाऊस पडेल या आशेवर द्राक्ष बागांची मोठ्या प्रमाणात लागवड करून बागा जतन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र पुढील वर्षीही मागील वर्षापेक्षा कमी पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून, कमी पाण्यामुळे संपूर्ण शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.पाटोदा येथील शेतकरी संदीप सोनवणे व किरण सोनवणे या बंधूंनी आपल्या शेतात चार वर्षांपूर्वी एका द्राक्ष वाणाची दोन एकरामध्ये लागवड केली होती.पावसाळ्यात एकही विहीर भरली नाहीच्येवला तालुक्यात या वर्षी १९७२च्या दुष्काळा पेक्षाही भयाण दुष्काळ शेतकरी अनुभवीत आहे. परिसरातील एकही विहीर या वर्षी पावसाच्या पाण्याने भरली नाही. नगदी पीक म्हणून जोपासलेल्या बागांना याचा फटका बसला आहे. या अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे बागा वाचविणे अवघड बनले. पिण्यासाठीच पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने बागांना कुठून पाणी आणावे? असा प्रश्न उत्पादक शेतकºयांना पडला आहे.त्यामध्ये सुमारे २,२०० झाडांचा समावेश होता. द्राक्ष पीक सुरू झाल्यानंतर चांगले उत्पन्न मिळेल या आशेने लागवड करताना बागेसाठी लागणारे लोखंडी अँगल पाण्यासाठी ड्रीप असा सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च केला. शेतात द्राक्षबाग उभी राहिल्यानंतर बागेसाठी पोषक द्रव्ये, कीटकनाशके आशा औषधांवरदेखील सुमारे ८ ते १० लाख खर्च केला, असा सुमारे वीस लाख रु पये खर्च करूनही पदरात काहीच पडत नसल्याने व पुन्हा पुन्हा बागेवर खर्च करून आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने तसेच लागवड केलेले द्राक्ष वाण उत्पन्न रहित असल्याने सलग तीन वर्षे वाट बघूनही पाहिजे तसे उत्पन्न मिळाले नाही. गेल्या चार-पाच वर्षांपासून परिसरात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने दुष्काळी वातावरणाचाही द्राक्षबागेला फटका बसत आहे. येणारे उत्पन्न अतिशय तुटपुंजे असल्याने त्यातून झालेला खर्च भागनेच अवघड होत असल्याने नफ्याचा तर विषयच नाही. म्हणून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्याने अखेर सोनवणे बंधूंनी आपल्या द्राक्षबागेवर कुºहाड चालविली आहे.
दोन एकर द्राक्षबागेवर चालविली कुºहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 1:44 AM
येथील तरु ण व प्रयोगशील शेतकरी संदीप सोनवणे या द्राक्ष उत्पादक शेतकºयाने पाण्याची कमतरता तसेच लागवड केलेले द्राक्ष वाण उत्पन्न रहित असल्याने आपल्या दोन एकर द्राक्षबागेवर स्वत: तसेच मजुरांकरवी कुºहाड चालवीत संपूर्ण द्राक्षबाग भुईसपाट करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
ठळक मुद्देदुष्काळ : सततच्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना बागा जगविणे झाले अवघड