चांदवड - तालुक्यातील मेसनखेडे शिवारातील गट नं दोनशे अकरामधील रंजना संजय खताळ यांचे पाझर तलावालगतचे दोन एकर लागवड केलेले कांदे वाहून गेल्यामुळे तर कांद्याचे क्षेत्र वाहुन गेले. त्याचबरोबर जमिनीतील पुर्णपणे माती खरडली गेल्याने आत खडकावर आल्याने हे शेतकरी कुंटूब हतबल झाले असून बळीराजा हवालदिल झाला आहे .
गेल्या दिड महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे चांदवड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु दि. १ नोव्हेबर रोजी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मेसेनखेडे शिवारातील रंजना संजय खताळ या महिलेचे दोन एकर लागवड केलेल्या कांद्यातून पाझर तलावातील पाणी गेल्याने संपूर्ण कांदा पिक शेतातील माती सहीत वाहून गेले आहे. खताळ यांना कांद्याचे शेत तयार करण्यापासून ते लागवडीपर्यत एक लाखाच्यावर खर्च आला आहे. शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खताळ यांनी केली आहे .