मालेगाव : नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट भरून निघावी म्हणून जिल्ह्यातील दोन लाख ६८ हजार ६१० शेतकºयांनी खरीप हंगामातील पिकांना विम्याचे कचव घेतले आहे. २ आॅगस्टअखेर जिल्ह्यात दोन लाख ५७ हजार ४६८ शेतकºयांनी पीकविमा, तर ११ हजार १४२ शेतकºयांनी फळ पीकविमा काढून घेतला आहे.जिल्ह्यातील एक लाख ६६ हजार ११४.५६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे. शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना तसेच हवामान आधारित फळ पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकºयांनी सहभाग घ्यावा यासाठी जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकºयांचा समावेश करण्यात आला होता. ही योजना ऐच्छिक आहे. प्रतिकूल हवामान घटकामुळे सर्वसाधारण क्षेत्रात पेरणी व लावणी न होणे, प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान म्हणजेच काढणीच्या १५ दिवस आधी पावसाने मारलेली दडी, दुष्काळ, पूरस्थिती यामुळे अपेक्षित सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के घट असेल तर तसेच पीक पेरणी काढणीपर्यंतच्या पिकांच्या उत्पादनात कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव व नैसर्गिक आपत्ती, भूकंप, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, ढगफुटी, पीक काढणीनंतर चौदा दिवसाच्या आत शेती उत्पादनाचे नुकसान झाले तर विमा घेतलेल्या शेतकºयांना या योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी शासनाने प्रतिहेक्टरसाठी पीकनिहाय विम्याचे दर निश्चित केले होते. यात कापूस २ हजार २५० रुपये, मका ६०० रुपये, कांदा ३ हजार २५० रुपये, ज्वारी ९०० रुपये, बाजरी ४४० रुपये, सोयाबीन ९०० रुपये, भुईमूग ७०० रुपये, मूग - उडीद ४०० रुपये, तूर ७०० रुपये असे आहेत.
अडीच लाख शेतकऱ्यांना लाभले पीकविम्याचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:43 PM
मालेगाव : नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे तसेच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेली घट भरून निघावी म्हणून जिल्ह्यातील दोन लाख ६८ ...
ठळक मुद्देशासनाची ऐच्छिक योजना : कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश