नाशिक: केारोनाचा सामना करीत नाशिक जिल्ह्यासह विभागात कोरोना नियंत्रणात आहे. विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, मृत्युदर १.९० टक्के इतका आहे. चारही जिल्ह्यांनी कोरोनाला रोखण्यात यश मिळविले आहे.
विभागातून आजपर्यंत दोन लाख ५३ हजार ३६९ रुग्णांपैकी २ लाख ४४ हजार १५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४ हजार ४०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत विभागात ४ हजार ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३६ आहे, तर मृत्युदर १.९० टक्के इतका आहे, अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडल कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी दिली आहे.
विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये १० लाख ६० हजार ८८३ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी २ लाख ५३ हजार ३६९ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच ६ हजार १३६ व्यक्ति होम क्वारंटाईन तर ३८५ व्यक्ति संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ यांनी दिली आहे.
---इन्फो--
नाशिक जिल्हा : १ लाख ३ हजार २८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ७ हजार ८१९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ३ हजार २८६ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २ हजार ६१० रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के इतके आहे. आजपर्यंत १ हजार ९२३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
जळगांव : जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के, आजपर्यंत ५५ हजार ४६० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५३ हजार ७५२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३८९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९२ टक्के इतका आहे. आजपर्यंत १ हजार ३१९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
धुळे जिल्हा: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७० टक्के, धुळे जिल्ह्यात आजपर्यंत १४ हजार ३५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १३ हजार ७४१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २३१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७० टक्के इतके आहे. आजपर्यंत ३८५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
अहमदनगर: 642 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अहमदनगरला आजपर्यंत ६७ हजार ८५९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६६ हजार १९२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६४२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५४ टक्के इतका आहे. आजपर्यंत १ हजार ०२५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
नंदुरबार: जिल्ह्यात 529 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ८७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७ हजार १८० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५२९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१८ टक्के इतके आहे. आजपर्यंत १६५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.