पोलीस निरीक्षक अनंत तारगे, पोलीस उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, सहायक निरीक्षक बैरागी, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस शिपाई महेश कुमावत व होमगार्ड असे पथक संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या इसमांवर कारवाई करीत होते. या पथकास पालखेड चौफुलीवर आयशर (क्र. जीजे २१ डब्लू ६७१४) गाडी चार गायी व एका वासरूची वाहतूक करताना आढळून आली. पोलिसांनी आयशर गाडीसह ११ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, गोवंश बंदी कायदा व कोरोना विषाणू संदर्भात असलेले कायदे यांचे उल्लंघन केल्यामुळे वाहनचालक प्रभुभाई सोनुभाई वळवी (४०) व संदीपभाई देवरामभाई गार्डर (२८, दोघेही रा. आंबापाडा ता.वघई जि. अहवा डांग, गुजरात) यांना अटक करण्यात आली. पाचही जनावरांना चारापाण्यासाठी गोशाळेत पाठविण्यात आले आहे.
फोटो- २१ दिंडोरी १
दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलेले कत्तलीसाठी वाहतूक करणारे वाहन. समवेत पोलीस निरीक्षक अनंत तारगे, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व कर्मचारी.
===Photopath===
210421\21nsk_22_21042021_13.jpg
===Caption===
दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतलेले कत्तलीसाठी वाहतूक करणारे वाहन. समवेत पोलीस निरीक्षक अनंत तारगे, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व कर्मचारी.