नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत अवघे दोन अर्ज दाखल झाले असून, प्रमुख राजकीय पक्षांकडून सोमवारी (दि.१९) उमेदवारी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. दि. २० मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.प्रभाग १३ मधील रिक्त जागेसाठी येत्या ६ एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. आतापर्यंत समीना कयुम पठाण आणि ज्योती नागराज पाटील या दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मनसेकडून अॅड. वैशाली भोसले यांचे नाव निश्चित असून, शिवसेनेकडून माजी नगरसेवक संजय चव्हाण यांची कन्या स्नेहल चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपाकडून माजी नगरसेवक हरिष लोणारी यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आहे, तर गणेश मोरे यांच्याही पत्नीच्या नावाची चर्चा आहे. राजकीय पक्षांकडून सोमवारी (दि.१९) अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.दरम्यान, भाजप कोणता उमेदवार देते याकडे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे लक्ष लागून आहे. भाजपने निवडणूक लढविली तर शिवसेनाही लढणार असल्याचे यापूर्वीच महानगरप्रमुखांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
पोटनिवडणुकीसाठी दोन अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:27 AM
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत अवघे दोन अर्ज दाखल झाले असून, प्रमुख राजकीय पक्षांकडून सोमवारी (दि.१९) उमेदवारी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. दि. २० मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
ठळक मुद्देराजकीय पक्षांकडून सोमवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता शिवसेनेकडून माजी नगरसेवक संजय चव्हाण यांची कन्या स्नेहल चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता