चांदवड : चांदवड तालुक्यातील मंगरूळ फाट्यावर उमराणा येथील एका शेतकऱ्याला दोन तरुणांनी मारहाण करून त्याची दुचाकी, भ्रमणध्वनी व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. मात्र पोलिसांनी तातडीने तपास करून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात उभे केले असता २२ जूनपावेतो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उमराणे येथील शेतकरी देवीदास देवरे हे कांदे विकून दुचाकीने (क्र. एमएच ४१ एएच ४८९७) घरी जात असताना त्यांना दोन तरुणांनी मारहाण करून पाच हजार रुपये रोख, भ्रमणध्वनी व लाल रंगाची प्लॅटिना दुचाकी चोरून नेल्याची फिर्र्याद देवरे यांनी दिली होती. पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी, जमादार मार्तड, शिवाजी कुशारे, चंद्रकांत निकम, घोडे, चंद्रकांत साबळे, दिलीप अहेर यांनी संशयितांना पकडले. शिवाजी काळे, संदीप चव्हाण अशी त्यांची नावे असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कत्रण्यात आला. त्यांना चांदवड न्यायालयात हजर केले असता २२ जूनपावेतो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (वार्ताहर)
मंगरुळ फाट्यावर लूटमार करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 11:57 PM