शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

एमडी 'मेफेड्रोन' पावडर विक्री करणार्‍या दोघा विद्यार्थ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:13 PM

शहरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली.

ठळक मुद्देमहाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी मेफेड्रॉन म्हणजेच एमडी पावडरची नशा केल्याचे उघड

नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी पावडर विक्री करणार्‍या दोघांना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 ग्रॅम वजनाची पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.साहिल शरफोद्दीन पठाण (21, रा. खडकाळी) आणि नवाज रियाज सैयद (19, रा. मुंबई नाका) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांनी बुधवारी (दि.16) गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळून अंमली पदार्थाच्या नशेत असणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडील प्राथमिक चौकशीत त्याने मेफेड्रोन म्हणजेच एमडी पावडरची नशा केल्याचे उघडकीस आले. शहरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळी मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाच्या मदतीने सोहिल आणि नवाज यांना ताब्यात घेतले. हे दोघेही संगनमत करून एमडी पावडर विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यांच्याकडून 38 हजार 100 रुपयांचे अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या दोघांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले, सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर, उपनिरीक्षक हिरे, हवालदार दिलीप ढुमणे, पोलीस शिपाई मिलींद बागुल आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकStudentविद्यार्थी