इगतपुरी : धावत्या रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात शिरून चोरी करणाºया दोन हायप्रोफाइल चोरांना इगतपुरी रेल्वे पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी दिली.अल्पना रविशंकर अग्रवाल (५१), रा. अंबाझरी, नागपूर या दि. १४ फेब्रुवारी रोजी दुरांतो एक्स्प्रेसने नागपूर ते मुंबई असा वातानुकूलित डब्यातून प्रवास करत असताना सदरची गाडी इगतपुरी येथून सुटल्यानंतर पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये रोख एक लाख पासष्ट हजार रुपये रोख, २५ हजार रु पये किमतीचा रेबन गोगल, १५ हजार रुपयांचा मोबाइल, पासपोर्ट, विमानाचे तिकीट व इतर महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण २ लाख ११ हजार रु पयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची फिर्याद त्यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.पोलिसांच्या तपासात संशयित आरोपी हरविंदरसिंग सुरेंदरसिंग (३४) व गौरवसिंग सुरेंदरसिंग (२४), दोघे, रा. वार्ड नं.२४ हल्दनपूर, मुल्लाखेडा, जि. बिगनोर उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील रोख एक लाख बासष्ट हजार ८२० रु पये, रेबन गॉगल असा एकूण एक लाख चौºयाहत्तर हजार ८२० रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, धावत्या रेल्वेच्या वातानुकूलित बोगीतून उच्चभ्रू प्रवाशांच्या पर्स चोरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी यापूर्वीही नागपूर, सोलापूर, पुणे, उजैन या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव,उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, पोलीस हवालदार हेमंत घरटे, अजबे, वारु ळे, कातोरे, यांनी तपास करून या गुन्ह्यात अटक केली आहे.
धावत्या रेल्वेत चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 6:24 PM