मालेगाव : मालेगाव शहर व भिवंडी (जि. ठाणे) येथून दुचाकी चोरणारे सलमान मोहंमद अली मन्सुरी (२१), मुशरफ बरकत अली (१९) दोघे रा. भिवंडी. या दोघांना येथील दुसरे तदर्थ न्यायालयाचे न्या. व्ही. एच. देशमुख यांनी ३० दिवसांचा कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जलद गतीने हा निकाल देण्यात आला आहे. शहर पोलीसांनी अवघ्या दहा दिवसात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या दोघा चोरट्यांनी मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन दुचाकी चोरल्या होत्या. याप्रकरणी ९ आॅक्टोबर २०१८ रोजी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे येथील राबोडी पोलीस ठाण्याने दोघा संशयीतांनी शहर पोलीसांच्या गुन्ह्याच्या तपासासाठी वर्ग केले होते. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्ही. एन. ठाकुरवाड यांनी यात लक्ष घालुन संशयीत आरोपींना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर दोघांनी दुचाकी चोरीची कबुली देत, चोरीला गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.जलद गतीने खटला चालवून संशयीतांना शिक्षा दिली आहे.
दोघा दुचाकी चोरट्यांना महिनाभर कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 6:41 PM
मालेगाव : मालेगाव शहर व भिवंडी (जि. ठाणे) येथून दुचाकी चोरणारे सलमान मोहंमद अली मन्सुरी (२१), मुशरफ बरकत अली (१९) दोघे रा. भिवंडी. या दोघांना येथील दुसरे तदर्थ न्यायालयाचे न्या. व्ही. एच. देशमुख यांनी ३० दिवसांचा कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जलद गतीने हा निकाल देण्यात आला आहे.
ठळक मुद्देजलद गतीने खटला चालवून संशयीतांना शिक्षा दिली