पहिल्या घटनेत फिर्यादी समीर रमेश धात्रक (३३, रा. मखमलाबाद रोड) यांनी मुंबईनाका येथील भगवंतराव समाज मंदिराजवळ त्यांची दुचाकी (एमएच १५ ईआर ८८०८) चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यांनी ३० हजार रुपयांची दुचाकी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत अजहर फिरोज पठाण (३३, रा. बागवानपुरा) यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १५ एफके ९६९२) १५ हजार रुपयांची दुचाकी चोरट्याने बागवानपुरा परिसरातून गायब केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयासमोरून चोरट्याने स्वप्नील प्रकाश मोरे यांच्या ताब्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचा लहान टेम्पो (एमएच १५ एचएच ११२९) चोरट्यांना लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पोसह दोन दुचाकी केल्या गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:20 AM