शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोटातील उपचार घेणाऱ्या २ सख्ख्या भावांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 6:14 PM

Cylinder Blast : सिलिंडर बदलताना गळती होऊन शुक्रवारी घडली होती दुर्घटना

ठळक मुद्देरविवारी दोघा तरुण सख्ख्या भावांची प्राणज्योत मालावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अन्य जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.  

नाशिक : जुन्या नाशकातील वडाळानाका भागात असलेल्या संजरीनगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि.2) रात्री बारा वाजेच्या सुमारास अचानकपणे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले होते, त्यापैकी रविवार दुपारपर्यंत एकाच कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. रविवारी दोघा तरुण सख्ख्या भावांची प्राणज्योत मालावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अन्य जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.  इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये राहणाऱ्या सैय्यद कुटुंबियांच्या घरी शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गळती होऊन स्फोट झाल्याची दुर्घटना घडली होती.  घरातील सिलिंडर रिकामे झाल्याने दुसरे सिलिंडर बसवित असताना रेग्युलेटर लावण्याचा प्रयत्न केला असता सिलिंडरमधून गॅसची वेगाने गळती होऊ लागली यामुळे घरातील पुरुषांनी सिलिंडर पेटू नये म्हणून जवळच पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये फेकले. यावेळी सिलिंडरमधील गॅस अचानकपणे सर्व घरात पसरला आणि मोठा स्फोट होऊन फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तात्काळ घरातील महिला, मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढून एका लहान टेम्पोतून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले होते.या दुर्घटनेत सय्यद नुसरत रहीम (वय२५), शोएब वलिऊल्ला अन्सारी (२८), मुस्कान वलिऊल्ला सय्यद (२५), नसरीन नुसरद  सय्यद (२५), सईदा शरफोद्दीन सय्यद( ४९),, आरीफ सलिम अत्तार  (५३), सय्यद लियाकत रहीम ( ३२), रमजान वलिऊल्ला अन्सारी(२२) असे आठ लोक भाजले होते. शनिवारी (दि.3) रात्री उशिरापर्यंत उपचारादरम्यान नसरीन नुसरद सय्यद (25)  सईदा शरफोद्दीन सैयद (49) या नणंद- भावजयीचा मृत्यु झाला तर रविवारी नसरीनचा पती नुसरद रहीम सैय्यद आणि त्याचा सख्खा भाऊ लियाकत रहीम सय्यद याचाही दुर्दैवाने मृत्यु झाला. नुसरद 63 तर लियाकत 27 टक्क्यांपर्यंत भाजला होता तर नणंद-भावजयी 95 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात भाजलेल्या होत्या. तसेच शोएब अन्सारी हा युवक 90 भाजला असून  प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

सय्यद कुटुंबियांवर कोसळला द:खाचा डोंगरजून्या नाशकातील संजरीनगर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सय्यद कुटुंबीयांवर या दुर्घटनेमुळे दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सय्यद कुटुंबीयाने या दुर्घटनेत आपल्या दोघे तरुण मुलांसमवेत मुलगी व सुनेला कायमचे गमावले आहे. या दुर्घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी ननंद-भावजयीच्या मृतदेहांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी होत नाही तोच रविवारी दोघा तरुण मुलांची प्राणज्योत उपचारादरम्यान मालवली. या घटनेने या कुटुंबीयांना मोठा धक्का दिला आहे. एकाच कुटुंबात लागोपाठ चार मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरBlastस्फोटNashikनाशिकDeathमृत्यू