नाशिक : टाकळी रोड भागात सिंगापूर गार्डन परिसरातील पीनाक बी -५ अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक १०३ मध्ये गुरुवारी दुपारी एक वाडेच्या सुमारास घरफोडीटी घटना घडली असून या घटनेत अज्ञात चोरट्यांनी घरातून जवळपास लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिनाक बी-५ अपार्टमेंटमधील रहिवासी सिताराम ज्ञानदेव जेजूरकर (६१) यांच्याघरी अज्ञात चोरटयांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास कोणीही नसल्याचे पागून घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लोखंडी कपाट व लॉकर तोडून त्यातील ३६ हजार रुपये किंमतीचे दोन मनी मंगळसूत्रे, २० हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३० हजार रुपये किंमतीती व १४ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, १२ हजार रुपये किंमतीचे व ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन टॉप्स व २ ग्रॅम वजणाची सोन्याची नथ असे एकूण ९८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी सिताराम जेजूरकर यांच्या फिर्यादीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मूदगल या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सातपूरलाही घरफोडी सातपूरच्या सोमेश्वर कॉलनी परिसरातही घरफ ोडी झाल्याची घटना उघड झाली आहे. सोमेश्वर कॉलनीतील निरंजन पुंजाराम मुटकुरे(४२) यांच्या बंद घराचा दि. ७ मार्च रात्र साडेनऊ ते १४ मार्च पहाटे साडेपाचवाजे दरम्यान, दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच १४ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, एक ग्रॅम सोन्याची नथ,दीड ग्रॅमची अंगठी, दीड ग्रॅम चांदीच्या तोरड्या, चारशे ग्रॅम चांदीचा कमरपट्टा,१०० ग्रॅम चांदीचा छल्ला, दिडशे ग्रॅम हातातले कडे, ५ ग्रॅम चांदीची मूर्ती. २ टेसा कंपनीची घड्याळे, असा एकूण ७० हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्र्रकरणी सातपूर पोलीस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.