सिडको : येथील माउली लॉन्स परिसरात गेल्या शुक्रवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास पेट्रोलिंग करीत असताना तिघे संशयितरीत्या फिरत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्या तिघांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून दोन जीवंत काडतूस व एक गावठी कट्टा तसेच दोन दुचाकी व पाच मोबाइल असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शुक्रवारी (दि.१९) सायंकाळच्या सुमारास गस्त घालणाऱ्या पोलिसांना येथील माउली लॉन्स परिसरात तीन संशयित व्यक्ती उभ्या असून, यातील एकाकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळालीे. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन कसून तपासणी केली असता त्यांच्याकडून दोन जीवंत काडतुसांसह एक गावठी कट्टा तसेच दोन दुचाकी व पाच मोबाइल असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील संशयितांमध्ये चंदन उर्फ दीपक ब्रह्मदेव दुबे (२१, रा. महालक्ष्मीनगर, अंबड), अभिषेक उद्धव विश्वकर्मा (१९, रा.स्वामीनगर,अंबड), प्रदीप केवट मंत्री उर्फ बाबा (२१, रा.दत्तनगर) या तिघांनी म्रीनल राजेश्वर रभा उर्फ आसामी (२९, रा. डीजीपीनगर, अंबड) याच्याकडून गावठी कट्टा विकत घेतला होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सहारे, तुषार चव्हाण यांच्यासह दत्तात्रय विसे, शंकर काळे, धनंजय गवारे, जोपळे, विजय वरंदळ, कचेश्वर पानसरे आदिंचा समावेश आहे. दरम्यान, या चौघा संशयितांना शनिवारी (दि़२०) न्यायालयात हजर केले असता २६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (वार्ताहर)
दोन काडतुसांसह गावठी कट्टा जप्त
By admin | Published: August 21, 2016 1:59 AM