नाशिक : सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढून देण्यासाठी व नियमीत पगार देण्याच्या मोबदल्यात १९ हजार ७१५ रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. नाशिक डिस्ट्रीक्ट सेकेंडरी टिचर्स -नॉन टिचिंग को-ऑप सोसायटीचे शाखा व्यवस्थापक शरद वामनराव जाधव आणि व्यवस्थापक जयप्रकाश रघुनाथ कुवर अशी दोघा संशयित लाचखोरांची नावे आहेत.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी वेतनाचा फरक व नियमीत पगार काढण्यासाठी सोसायटीत मागणी केली. मात्र शाखा व्यवस्थापक जाधव व व्यवस्थापक कुवर यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाने तक्रारीची शहानिशा करुन सापळा रचला. त्यात बुधवारी (दि.१०) शरद जाधव यांनी सोसायटीच्या कार्यालयात तक्रारदाराकडून स्विकारली. त्यानुसार विभागाने दोघांनाही पकडले.