ओझर : येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय म्हणून येत्या शनिवारी (दि.१०) व रविवारी जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या बैठकीत स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.मागील आठवड्याभरात झपाट्याने वाढत गेलेला कोरोनाग्रस्तांचा आकडा चिंतेचा विषय ठरला असताना गावातील व्यापारी असोसिएशनतर्फे ग्रामपालिका कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्यात गावातील वाढते रुग्ण तसेच सततची होणारी गर्दी पाहता अनेक व्यापाºयांनी मत व्यक्त केले. चर्चेअंती झालेल्या निर्णयात ओझरच्या बाहेरून भाजीपाला विक्रीसाठी येणाºया व्यावसायिकांना बंदी घालण्यात आली आहे.तर सर्व दुकाने दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. काही व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी दोन दिवसांच्या कर्फ्युला विरोध केला आहे.त्यामुळे व्यापाºयांच्या बैठकीनंतर दोन मतप्रवाह बघण्यास मिळाले. प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून दोन दिवसांच्या जनता कर्फ्युला हिरवा कंदील दिला आहे.सदर बैठकीला जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, उपसरपंच रज्जक मुल्ला, ग्रामपालिका सदस्य प्रकाश महाले, सागर शेजवळ,मंडळ अधिकारी प्रशांत तांबे आदींसह गावातील व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
ओझरला वाढत्या संसर्गामुळे दोन दिवसीय जनता कर्फ्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:38 PM