नाशिक : शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आणि स्थायी समिती सभेत रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न चांगलाच गाजला. रस्त्यांच्या बांधणीनंतर तीन वर्षांच्या आत खड्डे पडले असतील अशा रस्त्यांच्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आणि दोन दिवसांत खड्डे भरण्याचे आदेश सभापती उद्धव निमसे यांनी दिले असतानाही शहरातील खड्ड्यांची समस्या मात्र अजूनही ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे.अतिवृष्टी त्यानंतर शहरात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. खड्डे बुजविण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीदेखील अनेकदा मागणी केली. मात्र खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाकडून कसूर होत असल्याने त्याचे पडसाद गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समिती सभेत उमटले होते. यावेळी संतप्त नगरसेवकांनी खड्डे बुजविण्यासाठी असलेल्या ३८ कोटींच्या तरतुदीची आठवण करून देत प्रशासन काय करतेय? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने बेकायदेशीर बांधकामे तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता.खडीमुळे रस्ते अधिक धोकादायकज्या ठिकाणी खडी टाकण्यात आली त्या ठिकाणचा मार्ग तर अधिकच खडतर झाला आहे. त्र्यंबकरोडवरील एसटी डेपो चौक, सारडा सर्कल, शालिमार चौक, अशोकस्तंभ येथील मार्ग खडतर झाले आहेत. द्वारका चौकातील खड्डे अद्यापही बुजविण्यात आलेले नाहीत.
दोन दिवसांनंतरही खड्डे ‘जैसे थे’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:40 AM
शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आणि स्थायी समिती सभेत रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न चांगलाच गाजला. रस्त्यांच्या बांधणीनंतर तीन वर्षांच्या आत खड्डे पडले असतील अशा रस्त्यांच्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आणि दोन दिवसांत खड्डे भरण्याचे आदेश सभापती उद्धव निमसे यांनी दिले असतानाही शहरातील खड्ड्यांची समस्या मात्र अजूनही ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देसभापतींचे आदेश ‘खड्ड्यात’ : काही ठिकाणी खडी रस्त्यावर