चौकट-
आतापर्यंत अपेक्षित पाऊस - ७३१.८१
प्रत्यक्ष झालेला पाऊस - ५७८.०१
पेरणी वाया जाण्याची शक्यता (खरीप पिकांचा आढावा. हेक्टर्समध्ये)
ज्वारी - ९७५
बाजरी - ७२२६२.४०
सोयाबीन - ८८६९१.२६
मका -२२८००२.००
भात - ५७७९०.९६
भुईमुंग - २३३९५.२०
चौकट-
पाणीसाठा ५६ टक्क्यांवर
मध्यम - १७६६०
मोठे - ४८००४
चौकट-
उसनवारी कशी फेडणार?
कोट-
मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. बाजरी काळी पडल्याने चांगला भाव मिळाला नाही. यावर्षी उसनवारी करून मकाची लागवड केली आहे. दोन पैसे हाती लागतील अशी अपेक्षा होती; पण पावसाने ओढ दिल्याने उत्पादन किती निघेल याचा कोणताही अंदाज बांधता येत नाही. यामुळे पाहुण्यांकडून घेतलेले पैसे फेडणार कसे याची आतापासूनच चिंता लागली आहे. - निवृत्ती डमाळे, शेतकरी
कोट-
यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज असल्यामुळे बँकेचे कर्ज काढून सोयाबीनची पेरणी केली. पेरणीच्या वेळी खतांचीही मात्रा दिली तेव्हा जमिनीत ओल होती. बी उतरून पडेल अशी अपेक्षा होती; पण नंतर पावसाने ओढ दिल्याने नुकसानकारक ठरली आहे. काही ठिकाणी साेयाबीन उतरलेच नाही पुन्हा सोयाबीन मोडून आता मका पेरला आहे. बघू आता काय होत ते - अशोक रसाळ, शेतकरी
कोट-
गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने पिके थोडीफार बहरली आहेत. जेथे जूनमध्ये पेरण्या झालेल्या आहेत तेथील पीक आता फुलोऱ्यात आहेत. या पावसावर ती निघून जाऊ शकतील. ज्या ठिकाणी पिकांना पाण्याचा खूपच ताण पडला आहे त्या ठिकाणी उत्पादनावर परिणाम होऊन घट येण्याची शक्यता आहे. - कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला