सटाणा व नामपूर बाजार समिती प्रशासनाने मोबाइलवर वाहननोंदणी करून कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा केल्याने शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पहिल्या दिवशी सटाणा बाजार समितीत ४७५ कांदा वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, बहुतांश शेतकरी आणि वाहनचालकांकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. प्रशासनाने तत्काळ रॅपिड ॲंटिजन किट उपलब्ध करून चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान दोन वाहनचालक बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाकडून टाळेबंदी शिथिलतेबाबत पुढील आदेश येईपर्यंत बाजार समिती प्रशासनामार्फत वाहनचालक व शेतक-यांची चाचणी केली जाणार असल्याचे सचिव भास्करराव तांबे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी वाहनेदेखील त्याच पद्धतीने लावण्यात येत असून दोन वेळा आवारात फवारणी केली जात आहे .
इन्फो
नामपूरला आजपासून लिलाव
नामपूर बाजार समितीत मंगळवार (दि. २५) पासून कांदा लिलाव सुरू करण्यात येणार असून सुमारे ५०० वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे, तर करंजाड उपबाजार आवारात तीनशे वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. करंजाडमध्ये सरासरी १४५० रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाला. करंजाड बाजार समिती आवारातदेखील बाजार समितीमार्फत कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, एकही कोरोनाबाधित आढळला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
फोटो - २४ सटाणा मार्केट
===Photopath===
240521\24nsk_27_24052021_13.jpg~240521\24nsk_29_24052021_13.jpg
===Caption===
फोटो - २४ सटाणा मार्केट ~फोटो - २४ सटाणा मार्केट