नाशिक : दिवाळी सणाची सर्वत्र धामधूम सुरू असताना दिंडोरी तालुक्यात लागोपाठ दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, जिल्ह्यात आजपर्यंत आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या आता ८८ झाली आहे. जिल्ह्णात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, रविवारी दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे राहणारे बाळासाहेब विठोबा कावळे (५२) यांनी आपल्या स्वत:च्या द्राक्षबागेतच विषारी औषध सेवन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कावळे यांच्या नावे बोपेगाव येथे गट नंबर ४६४ मध्ये ०.५० आर एवढे क्षेत्र असून, त्यांच्या नावे कर्ज आहे किंवा नाही याचा उलगडा प्राथमिक चौकशीत होऊ शकला नाही. मात्र तलाठी व पोलीस यंत्रणेने घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास केला जात आहे. तत्पूर्वी भाऊबीजच्या दिवशीच दिंडोरी तालुक्यातील टिटवे येथे राहणाºया राहुल विश्वनाथ गवळी या २१ वर्षीय तरुण शेतकºयाने दुपारी एक वाजता विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. राहुल याच्या नावावर शेतजमीन नसली तरी, त्याचे वडील विश्वनाथ मनोहर गवळी यांच्या नावे टिटवे येथे गट नंबर ८३ मध्ये २.६७ आर सामाईक क्षेत्र आहे. त्यामुळे राहुल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली काय याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने यासंदर्भात अधिक चौकशी सुरू केली आहे.ऐन दिवाळीत दोघा शेतकºयांच्या लागोपाठच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, यंदा दुष्काळी परिस्थिती, चारा, पाण्याची टंचाई लक्षात घेता शेतकºयांचे आत्महत्या सत्र थोपविण्याची मोठी जबाबदारी शासनावर येऊन पडली आहे. आजपावेतो ८८ शेतकºयांनी विविध मार्गांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.
ऐन दिवाळीत दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:28 AM