नाशिक : म्हसरूळ शिवारात असलेल्या सीता सरोवर येथे आंघोळीसाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल राजेंद्र साळुंखे (३४) व हेमंत श्रीधर गांगुर्डे (३३) अशी मयत झालेल्यांची नावे असून, अन्य तिघे मात्र बचावले आहेत.स्वामीनगर येथे राहणारा हर्षल साळुंखे, म्हसरूळ गावातील रहिवासी हेमंत गांगुर्डे व त्यांचे मित्र संजय बोंबले, दवंगे, विभांडिक असे पाच मित्र गुरुवारी (दि.२१) दिवसभर बरोबर होते. रात्री ११ वाजता पाचही जण म्हसरूळ शिवारातील सीता सरोवर येथील प्राचीन कुंडाजवळ गेले होते. त्यावेळी काहींना आंघोळ करण्याचा मोह झाल्याने ही घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.पाच मित्रांपैकी साळुंखे, गांगुर्डे आणि दवंगे असे तिघे पाण्यात आंघोळीसाठी उतरले, तर बोंबले आणि विभांडिक हे थंडी वाजते म्हणून ते कुंडाबाहेर थांबले. साळुंखे, गांगुर्डे व दवंगे या तिघांनी पाण्यात उड्या घेतल्यानंतर दवंगे याला पोहता येत असल्याने तो पाण्यातून कुंडाबाहेर आला, मात्र गांगुर्डे आणि साळुंखे पाण्यात गटांगळ्या खाऊन पाण्यात बुडू लागले तेव्हा दवंगे याने पुन्हा पाण्यात उडी मारून त्यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शोध घेतला असता ते मिळून आले नाही.
सीता सरोवरात बुडून दोघा मित्रांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:59 AM
म्हसरूळ शिवारात असलेल्या सीता सरोवर येथे आंघोळीसाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल राजेंद्र साळुंखे (३४) व हेमंत श्रीधर गांगुर्डे (३३) अशी मयत झालेल्यांची नावे असून, अन्य तिघे मात्र बचावले आहेत.
ठळक मुद्देतिघे बचावले : रात्री आंघोळीसाठी उतरले पाण्यात