ननाशी : दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा येथे विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील सावरपाडा येथील पल्लवी विश्वनाथ वाघमारे (१२), नीलम धर्मराज गवारी (१५) आणि कल्पना नामदेव गुंबाडे (१०) या तिघी मैत्रिणी कपडे धुण्यासाठी मंगळवारी (दि.१) दुपारच्या सुमारास सावरपाडा शिवारातील विहिरीवर गेल्या होत्या. कपडे धुऊन झाल्यानंतर पल्लवी आणि नीलम विहिरीच्या पाण्यात अंघोळ करू लागल्या. अचानक पल्लवी पाण्यात बुडायला लागल्याचे बघून नीलम तिला वाचवण्यासाठी धडपड करू लागली; पण दुर्दैवाने दोघीही पाण्यात बुडू लागल्या. विहिरीच्या काठावर बसलेल्या कल्पनाने आपल्या मैत्रिणींना पाण्यात बुडताना पाहून एकच आक्रोश करत गावात जाऊन ग्रामस्थांना बोलावून आणले.ग्रामस्थांनी या दोघींना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले; पण दुर्दैवाने ग्रामस्थांचे प्रयत्न अपुरे पडले आणि पल्लवी व नीलम या दोघी जिवलग मैत्रिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावातील नेहमी सोबत राहणाऱ्या जिवलग मैत्रिणींचा सोबतच करुण अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात सीआरपीसी १७४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गाढेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वसावे, हवालदार उशिरे, पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गावित, मोरे, घुटे हे करीत आहेत.
दिंडोरी तालुक्यात दोन मुलींचा विहिरीत बुडून अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:14 IST
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा येथे विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिंडोरी तालुक्यात दोन मुलींचा विहिरीत बुडून अंत
ठळक मुद्दे नेहमी सोबत राहणाऱ्या जिवलग मैत्रिणींचा सोबतच करुण अंत