शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
4
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
5
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
7
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
8
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
9
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
10
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
11
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
12
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
13
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
14
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
15
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
17
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
18
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
19
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
20
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा

चांदवड तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:33 PM

तालुक्यातील गणूर व बोराळे येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले असून, चिंचोले येथील ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

चांदवड : तालुक्यातील गणूर व बोराळे येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले असून, चिंचोले येथील ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.गटविकास अधिकारी हिरामण मानकर यांनी ही कारवाई केल्यामुळे ग्रामसेवकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विनापरवानगी गैरहजर राहणे, ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात अस्वच्छता ठेवणे, कार्यालयीन शिस्तीचा भंग करणे, ग्रामसेवकांचे पाक्षिक, मासिक तपासणीसाठी दप्तर उपलब्ध करून न देणे या विविध कारणांसाठी नोटिसा बजावूनही त्यास उत्तर न देता बेशिस्त वर्तन कायम ठेवल्याने गणूर येथील ग्रामसेवक बी.एम. पिंपळसे व बोराळे येथील ग्रामसेवक संजय परदेशी यांच्या निलंबनाची कार्यवाही गटविकास अधिकारी हिरामण मानकर यांनी केली. चिंचोले येथील ग्रामसेवक एस. एल. भदाणे यांची वेतनवाढ रोखली आहे. तालुक्यातील अशाच प्रकारच्या काही ग्रामसेवकांच्या तक्रारी पंचायत समितीकडे प्राप्त झाल्याने संबंधित ग्रामसेवकांना नोटिसा बजावूनही त्यात त्यांनी सुधारणा केली नाही. ग्रामसेवकांच्या बेशिस्त वर्तनामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गटविकास अधिकाºयांनी हा कार्यवाहीचा बडगा उगारला आहे. अजूनही काही ग्रामसेवकांवर अशा प्रकारची कारवाई होण्याची शक्यता असल्याने ग्रामसेवकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.