नाशिक : जिल्ह्यातील श्रेणी-१ व श्रेणी-२ चे सुमारे २४३ दवाखाने आयएसओ बनविण्यात येणार असून, हे दवाखाने श्रेणी एक व श्रेणी दोनमधील आहेत, हे पाहताच समजेल अशा प्रकारची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या निधीची केंद्र सरकारकडे मागणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.सभापती तथा उपाध्यक्ष नयना गावित यांच्या उपस्थितीत पशुसंवर्धन समितीची मासिक बैठक झाली. पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या रजिस्टर तपासणीचे शिबिर सुरू असून, ते या महिन्याअखेर संपणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील २४३ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ बनविण्यात येणार असून, त्यासाठीचा निर्णय ७५ टक्के केंद्र सरकारकडून, तर २५ टक्केचा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही विभाग करणार आहे. तसेच राज्यस्तरीय योजना राबविताना नागरिकांच्या राज्यस्तरावरील अधिकाºयांबाबत अनेक तक्रारी असून, त्याबाबत पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या अधिकाºयांची तक्रार करण्यात येईल, असे नयना गावित यांनी सांगितले. श्रेणी एक व श्रेणी दोन पशुवैद्यकीय दवाखान्यांसंदर्भात स्वतंत्र पॅटर्न विकसित करण्यात येणार असून, पाहताक्षणी पशुवैद्यकीय दवाखान्याची श्रेणी या पॅटर्नमुळे समजण्यास मदत होणार आहे. बैठकीस सदस्य समाधान हिरे, प्रभारी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी नरेंद्र निकम आदी उपस्थित होते.
अडीचशे पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 7:53 PM