नाशिक : जुने नाशिक, हरसूल, नाशिकरोड या भागातून सुमारे २०९ आबालवृद्ध भाविक पश्चिम बंगाल राज्यातील मालडा जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र पंडवाशरीफमधील जेष्ठ सुफी संत हजरत मखदूम आलम शेख अलाहुल हक पंडवी यांच्या वार्षिक उरु सासाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल झाले. त्यांनतर २२मार्चपासून कोरोना आजाराच्या पाशर््वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने या भाविकांचे महाराष्ट्रात येण्याचे सगळे मार्ग बंद झाले ते आजतागायत. मागील सव्वा मिहन्यांपासून आपल्या लहानग्यांना घेऊन ९८ महिला आणि ८५ पुरु ष हे पंडवाच्या कुतुब शहारातील एका खासदारांच्या निवासस्थानी वास्तव्यास आहेत. महाराष्टÑात परतणारे पुरेसे प्रवासी नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने अद्यापही या भाविकांना ‘हिरवा झेंडा’ दाखविलेला नाही.पश्चिम बंगालमधील मालडा जिल्ह्यातील कुतुबशहर हे प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. पंडवा या मुख्य शहरात हे तीर्थक्षेत्र आहे. सालाबादप्रमाणे मार्चमध्ये येथील सुफी संतांचा वार्षिक उरूस साजरा केला गेला. या उरुसासाठी मध्यनाशिक परिसरातून सुमारे २०९ भाविक रेल्वेने आपल्या कुटुंबियांसह पोहोचले. दरम्यान कोरोना आजाराने देशभरात थैमान घातल्यामुळे भारत सरकारकडून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे या भाविकांचे महाराष्ट्रात परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहे ते आजतागायत. परिणामी या भाविकांच्या नाशिकिस्थत नातेवाईकांमध्ये चांगलीच चिंता वाढली आहे; मात्र सर्व भाविक हे आपल्या नातेवाईकांसोबत सातत्याने मोबाईलद्वारे संपर्कात असून एकमेकांना धीर देत आहेत. परंतु गेल्या दीड महिन्यापासून आपले कुटुंबीय नातेवाईक आपल्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावर परराज्यात अडकून पडल्यामुळे येथील नातेवाईकमध्ये सहाजिकच तणावाचे वातावरण कायम आहे.
सुदैवाने कुतुब शहर व पंडवाच्या महिला खासदार मौसम नूरबी व माजी खासदार शहनाजबी कादरी यांनी या सर्व अतिथी भाविकांची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने स्वीकारल्यामुळे भाविकांचा मानसिक तणाव कमी झाला. या भाविकांची नूरबी यांच्या निवासस्थानासह तेथील १८ खोल्यांमध्ये ‘डिस्टन्स’ ठेवत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे कुतुब शहर चे सरपंच तसेच तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि माजी खासदार मौसम नूर बी यांच्यामार्फत मागील दीड ते दोन महिन्यांपासून सर्व भाविकांना चहा-नाश्तासह दोन वेळचे जेवण पुरविले जात असल्याचे येथे अडकून पडलेले छायाचित्रकार मोबीन पठाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांनी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे या २०९ भाविकांची संपूर्ण यादी सोपविले आहे तसेच त्याबाबत आता केंद्र सरकारकडून परराज्यात अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्याचा मार्ग मोकळा करून देण्याबाबत आदेश प्राप्त झाल्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या प्रशासनासोबत योग्य तो समन्वयात लवकरात लवकर साधून या भाविकांना तत्काळ नाशिक मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांच्या नाशिकिस्थत नातेवाईकांनी देखील व्यक्त केले आहे हे सर्व भाविक सुदैवाने सुदृढ असून त्यांना आरोग्याच्या कुठल्याही तक्र ारी नसल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले आहे त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी देखील करण्यात आली आहे मालदा जिल्ह्यामध्ये कोरोना चा फारसा प्रभाव नसल्याने हे सर्व भाविक पंडवामध्ये सुरिक्षत आहे. त्यामुळे येथील नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.दरम्यान, शहरातील राहत फाउण्डेशनच्या वतीनेसुध्दा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना पुन्हा निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर पंडवामध्ये अडकून पडलेल्या भाविकांना परतीचा मार्ग खूला करुन द्यावा, अशी मागणे फाउण्डेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.