नाशिक : राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमधील दोनशे उद्योजकांना फटका बसणार असून, शेकडो कामगार बेकार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात आता महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स आता या विषयात लक्ष घालणार आहे. राज्य सरकारने पर्यावरण हितासाठी घेतलेल्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे समर्थन करतानाच या उद्योजकांनी या निर्णयाची अंमलबजावणी मात्र घाईघाईन केली जात असल्याचे म्हटले आहे. एकट्या नाशिकमध्ये तब्बल दोनशे प्लॅस्टिक उद्योग आहेत. प्लॅस्टिकवर बंदी केल्यानंतर या उद्योगांनी काय करायचे, त्यांनी विविध बॅँकांकडून घेतलेल्या कर्जाचे काय होणार असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे नाशिक प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल कर्नावट यांनी सांगितले. यासंदर्भात असोसिएशनची तातडीची बैठक रविवारी (दि.२५) रात्री निवेक येथे झाली. व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणीच्या या विषयावर असोसिएशन महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजशीदेखील या सर्वांनी संपर्क साधला असून, चेंबरदेखील या विषयात लक्ष घालणार आहे.
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे दोनशे उद्योगांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:57 AM