------------------------
तरुणाला रॉडने मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : शहरातील हिरापूर भागात २० हजार रुपये उसनवार दिले नसल्याच्या रागातून मोहम्मद अर्शद मो. ताहीर याला लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या मोसीन शेख, शब्बीर अन्य दोघा जणांविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बोरसे हे करीत आहेत.
-------------------------
मालेगाव कॅम्पातून दोन दुचाकी लंपास
मालेगाव : शहरातील कॅम्प भागातून अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच ४१ झेड ००४७) चोरून नेली आहे. याप्रकरणी सोमनाथ आनंदा देवरे यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची दुचाकी कवायत मैदानावर चोरीला गेली आहे. पुढील तपास हवालदार देशमुख करीत आहेत. दुसऱ्या घटनेत तालुक्यातील सावतावाडी शिवारातून १८ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच ४१ एसी ९०४२) ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी वसंत गमन बच्छाव यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. पाटील करीत आहेत.
-------------------
महिलेला शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : शहरातील बापू गांधी चौकात महिलेला शिवीगाळ करून लोखंडी पाइपने सामानाची तोडफोड करणाऱ्या संशयित इमरान अली शराफत अली याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शकिला करीम देशमुख या महिलेने फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार शिरोळे करीत आहेत.
------------------
व्यापाऱ्याची फसवणूक
मालेगाव : शहरातील एका सायजिंगमध्ये कच्च्या मालापासून कापड बनवून देण्यास नकार देऊन व्यवहार पूर्ण नसताना खोटा व्यवहार दाखवून पैसे घेण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याला डांबून ठेवणाऱ्या अब्दुल अजीज खालीद अहमद, रियाज अहमद, खुर्शीद शेख यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेख मुदसीर शेख आतिक यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.
----------------
किरकोळ कारणावरून एकाला मारहाण
मालेगाव : बापू गांधी नगर भागात किरकोळ कारणावरून अल्ताफ शहा अख्तर शहा याला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या सादिक मलनग शहा, रुबिना सादिक शहा यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्ताफ शहा यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवलदार सलीम शेख करीत आहेत.
--------------------
विवाहितेचा छळ; तिघांविरुद्ध गुन्हा
मालेगावी : घर बांधण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक छळ करणाऱ्या सासरकडील तीन जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पूनम भूषण उशिरे या महिलेने फिर्याद दिली. पती भूषण ताराचंद उशिरे, छायाबाई ताराचंद कुशिरे, ताराचंद गणपत उशिरे यांनी शारीरिक-मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार बच्छाव करीत आहेत.