पंचवटी: पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळून होणाऱ्या अपघातांमुळेनाशिक शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असताना शुक्रवारी (दि.५) पंचवटीतील मालवीय चौक भागातील सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसºया मजल्यावरील जीर्ण झालेला जिना कोसळून दोघे जण जखमी झाले आहे.सुकेणकर लेनमधील जवळपास ४० वर्ष जुन्या श्रीराम अपार्टमेंटचा जीर्ण झालेला जिना कोसळून इमारतीतील रहिवासी सरिता जैन (५०) व धीरज लालवाणी (३०) असे दोघे जण जखमी झाले आहे. अग्निशामक दलाने तत्काळ बचाव कार्य सुरू केले. या अपार्टमेंटमध्ये दहा ते बारा सदस्य राहत असून, इमारत जुनी झाल्याने इमारतींचे जिनेही जीर्ण झालेले आहेत. यातील एक जिना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमाराला पाऊस सुरू असताना कोसळला.इमारतीत राहणाºया सरिता जैन या कपडे सुकविण्यासाठी जात असताना अचानक ही जिना कोसळला. तर यावेळी जिन्यात उभा असलेला धीरज ललवाणी हा तरुण जिन्यासह खाली पडला. या घटनेत जैन व ललवाणी हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
पंचवटीत इमारतीचा जीर्ण जिना कोसळून दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:44 AM