सिन्नर : भगुर - पांढुर्ली मार्गावरील दारणा नदीच्या पुलाजवळ चालत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला करुन विंचुरी दळवीच्या दोन युवकांना जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
संजय विष्णू खकाळे व मयूर तुकाराम दळवी हे दोघे मामेभाऊ हाॅस्पिटलमधून भावाच्या इंजेक्शनची चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यांची दुचाकी भगुर विंचुरी दळवी रस्त्यावरील दारणा पुलावर आली असता, बिबट्याने अचानक दुचाकीवर हल्ला केला. यावेळी मयूर हा गाडी चालवत होता तर त्याच्या पाठीमागे बसलेला संजय हा मोबाईलवर बोलत होता. दोघांना काही समजण्याच्या आतच बिबट्याने हल्ला केल्यामुळे संजयच्या हातातील मोबाईल खाली पडला तरी त्यांनी गाडी तशीच पुढे कशीतरी चालवत नेली. यावेळी एकाच्या कमरेला व दुसऱ्याच्या पायाला बिबट्याचे पंजे लागल्यामुळे जखम झाली आहे. काहीवेळाने रस्त्याने येणार्या-जाणार्या गाड्या जमा झाल्याने बिबट्या जवळच असलेल्या नाल्यात उतरला व दिसेनासा झाला. या परिसरात बिबट्याने माणसांवर हल्ले करण्याच्या घटना वाढत असल्याने वन विभागाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
फोटो- २४ सिन्नर १
विंचुरी दळवी येथील युवकाच्या पायाला बिबट्याच्या हल्ल्यात जखम झाली आहे.
===Photopath===
240521\24nsk_7_24052021_13.jpg
===Caption===
विंचुरीदळवी येथील युवकाच्या पायाला बिबट्याच्या हल्ल्यात झालेली जखम.