मानोरी : मागील चार ते पाच दिवसापासून येवला तालुक्यात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने तसेच वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.येवला तालुक्यातील पिंपळगांव लेप, जऊळके परिसरात सोमवारी (दि.10) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह पाऊस आण िगारांसह अचानक जोरदार हजेरी लावली होती. यात सुरवातीला वादळी वारा आण िगारांचा पाऊस पडण्यास सुरु वात झाल्यानंतर गारांचा दोन ते तीन इंच खच साचला होता तर जिकडेतिकडे वादळी वार्यामुळे शेतकरी वर्गाची दानाफाण झाली होती.वादळी वारे प्रचंड असल्याने पिंपळगांव लेप, शिरसगांव लौकि, जऊळके परिसरात मोठमोठे झाडे उन्मळून पडली असून काही झाडे थेट विजेच्या खांबावरती पडल्याने यात सुमारे 15 विजेचे खांब कोसळले असून काही विजेचे खांब वाकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पिंपळगाव लेप येथील रमेश गागरे यांचे पत्रा शेड आण िघराचे वादळी वार्याने सतरा हजार चारशे रु पयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वादळी वार्याचा वेग अति तीव्र असल्याने विजय पाडेकर यांच्या राहत्या घराच्या छताचे पत्रे उडुन थेट सुमारे दोन किलोमीटर अंतरावर जाऊन पडले असून यात त्यांची आई जन्याबाई पाडेकर विजय पाडेकर हे दोघे मायलेक यात जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर जऊळके शिवारात मिच्छंद्र जाधव यांच्या मळ्यातील दत्तमंदिरावर पिंपळाचे झाड कोसळल्याने पूर्ण मंदिर उध्वस्त झाले असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.जऊळके-जळगाव नेऊर रोडवर बाभळीचे झाड कोसळल्याने रहदारी बंद झाली होती.तसेच सातारे येथील दत्तात्रय दखने यांच्या एक एकरातील शेतातील शेततळ्याचा कागद उडून फाटला असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.तर पिंपळगाव लेप येथील गंगाराम काळे यांच्या जनावरांच्या शेडचे 10 लोखंडी पत्रे उडाली, सयाजी ठुबे यांच्या द्राक्ष बागाच्या 5 गल्या कोसळल्या तर नवनाथ ठुबे यांच्या जनावरांच्या छतावरील 9 पत्रे उडून गेली आहे.तसेच बबनराव बिडवे यांच्या पोल्टीफार्मच्या छताचे सिमेंटची 7 पत्रे फुटून गेली.तर आण्णा गायकवाड यांच्या शेतातील दीड एकर क्षेत्रातील पालीहाऊसचे शेडच्या छतावरील शेडनेट 30 टक्के फाटले आहे. वरील सर्व घटनेचा तलाठी कमलेश पाटील यांनी पंचनामा केला असून आर्थिक मदतीसाठी अहवाल येवला तहसील कार्यालयात सादर केला आहे.
पिंपळगाव लेप परिसरात वादळी वाऱ्यामुळे दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 8:05 PM
मानोरी : मागील चार ते पाच दिवसापासून येवला तालुक्यात मान्सून पूर्व अवकाळी पावसाने तसेच वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील पिंपळगांव लेप, जऊळके परिसरात सोमवारी (दि.10) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह पाऊस आण िगारांसह अचानक जोरदार हजेरी लावली होती. यात सुरवातीला वादळी वारा आण िगारांचा पाऊस पडण्यास सुरु वात झाल्यानंतर गारांचा दोन ते तीन इंच खच साचला होता तर जिकडेतिकडे वादळी वार्यामुळे शेतकरी वर्गाची दानाफाण झाली होती.
ठळक मुद्देजऊळकेत मंदिरावर झाड कोसळून झाले नुकसान